orona

देशभरातील एकूण ५९ लाख ३ हजार ९३३ कोरोनाबाधितांमध्ये ९ लाख ६० हजार ९६९ रूग्णांवर उपाचर (active cases)  सुरू आहेत. तसेच ४८ लाख ४९ हजार ५८५ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज (discharged) देण्यात आला आहे. देशात आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९३ हजार ३७९ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Virus)मोठ्या संख्येने होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ८५ हजार ३६२ नवे कोरोनाबाधित (new cases) आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू (deaths) झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ५९ लाखांचा टप्पा (crosses 59-lakh) देखील ओलांडला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare)  दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील एकूण ५९ लाख ३ हजार ९३३ कोरोनाबाधितांमध्ये ९ लाख ६० हजार ९६९ रूग्णांवर उपाचर (active cases)  सुरू आहेत. तसेच ४८ लाख ४९ हजार ५८५ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज (discharged) देण्यात आला आहे. देशात आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९३ हजार ३७९ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी देशात एकूण ७,०२,६९,९७५ नमूने तपासण्यात आले. त्यातील १३ लाख ४१ हजार ५३५ नमूण्यांची काल तपासणी झाली आहे. राज्यातही कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ७५७ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात १९ हजार ५९२ रूग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात आतापर्यंत ९ लाख ८०६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७६.३३ टक्के इतके आहे.