कोरोनाचा विषाणू काय हाहाकार माजवू शकतो याची आठवण भारतातील परिस्थितीने करून दिली ; टेडरोस घेब्रेएसेस यांनी व्यक्त केली चिंता

जिनिव्हा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे टेडरोस बोलत होते. भारतात वेगाने वाढणाऱ्या बाधितांची संख्या पाहून आपल्याला चिंता वाटत आहे, असे ते म्हणाले. भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखापेक्षा अधिक बाधित सापडल्याचा पार्शवभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

    नवी दिल्ली : करोनाचे विषाणू काय हाहाकार माजवू शकतो याची आठवण भारतातील परिस्थितीने करून दिली आहे, अशी भावना व्यक्त करून जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरोस घेब्रेएसेस यांनी भारतातील कोरोनाच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली.

    जिनिव्हा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे टेडरोस बोलत होते. भारतात वेगाने वाढणाऱ्या बाधितांची संख्या पाहून आपल्याला चिंता वाटत आहे, असे ते म्हणाले.
    भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखापेक्षा अधिक बाधित सापडल्याचा पार्शवभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देशात सध्या २४ लाख २८ हजार ६१६ सक्रिय बाधित आहेत.

    एकूण बधितांमध्ये हे प्रमाण १४.९३ टक्के आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यात एकूण बधितांच्या५९.१२ टक्के बाधित आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा अनेक रुग्णालयात निर्माण झाल्याने देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.