कोरोना व्हायरस लवकरच ऋतु बदलानुसार होणाऱ्या आजाराचं रुप करणार धारण ; आणखी काही वर्ष सामना करावा लागण्याची भीती : UN

कोरोना व्हायरसवर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांना असं आढळलं की, कोरोना व्हायरस ऋतु बदलामुळे होणाऱ्या हवामान बदलानंतर होणाऱ्या आजाराप्रमाणे होत राहील जर पुढील काही वर्षांपर्यंत हे अशाच पद्धतीनं कायम राहिलं तर कोरोना हा ऋतु बदलानुसार होणारा आजार होऊ शकतो.'

    नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरस लवकरच ऋतु बदलानुसार होणाऱ्या आजाराचं रुप धारण करु शकतो.तसेच पुढील काही वर्षांपर्यंत अशाचप्रकारे चिंता वाढवत राहील. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या एका वर्षानंतरही वैज्ञानिकांना या आजाराचं गूढ सोडवता आलं नाही. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत जवळपास २.७ मिलियन लोकांचा मृत्यू झाला आहे. काही जणांना ऋतु बदलला की जसं सर्दी, खोकला, ताप येतो त्याचप्रमाणं कोरोना आजार होण्याची शक्यता संयुक्‍त राष्‍ट्रांनी वर्तवली आहे. भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रत्येक देशाकडून प्रयत्न सुरु आहे.

    कोरोना व्हायरसवर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांना असं आढळलं की, कोरोना व्हायरस ऋतु बदलामुळे होणाऱ्या हवामान बदलानंतर होणाऱ्या आजाराप्रमाणे होत राहील जर पुढील काही वर्षांपर्यंत हे अशाच पद्धतीनं कायम राहिलं तर कोरोना हा ऋतु बदलानुसार होणारा आजार होऊ शकतो.’

    जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते,  जगभरात कोरोनाच्या प्रकरणात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण अमेरिका आणि युरोपचं राहिलं आहे.  या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या प्रकरणांची पातळी शिगेला पोहोचली होती आणि आठवड्याला ५० लाख प्रकरणं समोर येत होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यामध्ये कोरोनाच्या प्रकरणात घट झाली आणि हा आकडा २५ लाखांपर्यंत पोहचला होता.