कोरोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटमुळे आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा ताण येण्याची शक्यता ; WHOचा इशारा

१३ जुलैपर्यंत जगातील १११ देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. आणि येणाऱ्या काळात हे प्रमाण वाढण्याचीच शक्‍यता आहे असे यात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील पाहणीनुसार १७८ देशांमध्ये अल्फा विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर १२३ देशांमध्ये बिटा विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 

    जगभरात पुन्हा मोठ्या प्रमाणात डेल्टा व्हेरिएंटच्या केसेस वाढत आहेत. ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. तेथे या व्हेरिएंटच्या प्रसाराचा धोका अधिक असल्याने जगभरातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा मोठा ताण येण्याची शक्‍यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

    १३ जुलैपर्यंत जगातील १११ देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. आणि येणाऱ्या काळात हे प्रमाण वाढण्याचीच शक्‍यता आहे असे यात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील पाहणीनुसार १७८ देशांमध्ये अल्फा विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर १२३ देशांमध्ये बिटा विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

    या विषाणूंचा मोठा धोका असतानाच जगभरात अनेक ठिकाणी निर्बंधांना दिली गेलेली सूट आणि लसीकरणाचे कमी झालेले प्रमाण यामुळे हा विषाणू अत्यंत धोकादायक रीतीने प्रसारण पावण्याची शक्‍यता आहे.