kapil sibbal

कपिल सिब्बल म्हणाले कि, हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सोमवारी बैठक सात तासांपेक्षा अधिक काळ चालली. या बैठकीत अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपदाची सुत्रे कायम ठेवत पक्षाने पेचावर तात्पुरता तोडगा काढला. मात्र, त्या पत्रामुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पत्राची दखल घेत कार्यसमितीच्या बहुतांश सदस्यांनी या नेत्यांवर तीव्र टीका केली.

यामध्ये  कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कपिल सिब्बल म्हणाले कि, हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

भाजपशी हितसंबंधातून पत्र लिहिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांवर केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. या वृत्तावर नाराज होऊन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्या वक्ततव्याला आक्षेप घेणारा एक ट्विटर संदेश जारी केला होता. पण त्यावर खुद्द राहुल गांधी यांनीच कपिल सिब्बल यांना व्यक्ति्गत संपर्क साधून या वक्तेव्याचा इन्कार केल्याने कपिल सिब्बल यांनी आपले ट्विट मागे घेतले आहे.