covaxin

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या(corona new strain) पार्श्वभूमीवर आयसीएमआरनं(ICMR) महत्वाचे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, कोव्हॅक्सिन लसीमुळे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी ॲन्टीबॉडीज तयार होऊ शकतात.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या(corona new strain) पार्श्वभूमीवर आयसीएमआरनं(ICMR) महत्वाचे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, कोव्हॅक्सिन लसीमुळे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी ॲन्टीबॉडीज तयार होऊ शकतात. कोव्हॅक्सिन या लसीची निर्मिती भारत बायोटेक आणि एनआयव्हीने केली आहे.

आयसीएमआरनं असं म्हटलंय की, जे लोक ब्रिटनमधून भारतात आले होते आणि त्यांना या नव्या स्ट्रेनची बाधा झाली होती त्यांच्याद्वारे एनआयव्हीनं यशस्वीरित्या स्ट्रेनला यशस्वीरित्या आयसोलेट आणि कल्चर्ड करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये आढळून आलेला हा नवा स्ट्रेन हा आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा ६० ते ७० टक्के अधिक संसर्गजन्य आणि अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे.

आयसीएमआरच्या दाव्यानुसार कोव्हॅक्सिन जर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरदेखील प्रभावी असेल तर फक्त ब्रिटन नव्हे तर संपूर्ण जगाची कोरोनाच्या उद्रेकाची चिंता कमी होऊ शकते.