कोरोनाचा विस्फोट! मागील 24 तासांत देशात 35 हजार 178 नवीन कोरोना बाधितांची नोंद

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात 35 हजार 178 इतक्या नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.तर 37 हजार 169 इतक्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 440 कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

    देशात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु मागील 24 तासांत देशात 35 हजार 178 इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 37 हजार 169 इतक्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचप्रमाणे 2 हजार 431 इतक्या रूग्णांमध्ये घट झाली आहे.

    आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात 35 हजार 178 इतक्या नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.तर 37 हजार 169 इतक्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 440 कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 85 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

    कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण 3 कोटी 22 लाख 85 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 4 लाख 32 हजार 519 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे.