cowin app server crash

आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अ‍ॅपवर लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन(cowin app server crash) झाल्याची माहिती समोर येत आहे.

    केंद्र सरकार १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा(vaccination third phase) सुरु करणार आहे. या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अ‍ॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन(cowin app server crash) झाल्याची माहिती समोर येत आहे.

    सोशल मीडियावर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली आहे. दुपारी चारच्या सुमारास १७ कोटी ८८ लाख भारतीय आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करत होते. आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.

    आधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे.