kanhaiyaa and mewani in congress

कन्हैया कुमार यांच्यासोबत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणीही (Jignesh Mevani To Join Congress) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती.

    भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar To Join Congress)) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कन्हैया यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. कन्हैया कुमार यांच्यासोबत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणीही (Jignesh Mevani To Join Congress) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती.

    कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ही बैठक शक्य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनादेखील या भेटीची कल्पना नव्हती. खुद्द काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनादेखील कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीची खबर नव्हती.  दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काँग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आली होती. हे दोन्ही नेते आता येत्या २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

    कन्हैया कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाची बिहारमधील ताकद वाढणार आहे. जिग्नेश मेवाणींमुळे गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.