प्रेम विवाह केला म्हणून घरच्यांनीच केली तरुणीला जबर मारहाण, चाकू गरम करून ठिक-ठिकाणी दिले चटके

शेजारच्या तरुणासोबत (Neighbourhood youngster) प्रेमविवाह (love merriage) केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी (girls family) तिला जबर मारहाण (beat her केली. एवढेच नाही तर त्याच्या शरीरावर गरम चाकूने ठिक-ठिकाणी चटके दिल्याचे डाग पडले होते. तिच्या पतीला(husband) ही गोष्ट कळल्यावर त्याने पोलिसांना(call police) कळवले. मारहाणीचा आरोप असलेल्या पालकांना पोलिसांनी अटक (police arrest parents) केली आहे. प्रकरण दिल्लीच्या भालस्वा डेअरी भागातील (Bhalswa Dairy Part of Delhi) आहे.

    नवी दिल्ली : वयाने सज्ञान आहे. आयुष्यातील चांगले-वाईट निर्णय घेण्याची समजही आहे. पण, आपल्या पसंतीच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याची अशी शिक्षा मिळाली की त्या जखमा कधीच मिटणार नाहीत. अंगावर काटा आणणारं हे प्रकरण राजधानीतील भलस्वा डेरी भागातील आहे, या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी १९ वर्षाच्या तरुणीने न्यायलयात जाऊन विवाह केला आहे.

    मुलीने तिच्या सासरच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकल्याच्या काही तासांनंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला जबरदस्तीने तिच्यासोबत नेले. आई -वडिलांवर आरोप आहे की, सुरुवातीला त्यांनी तिला जबर मारहाण केली. त्यानंतर चाकू गरम करून तिचा चेहरा आणि शरीरावर चटके दिले. दुसऱ्या दिवशी तरुणाने पत्नीची अवस्था पाहिल्यावर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आणि तिच्या जबानीवर गुन्हा दाखल केला. कारवाई करत पोलिसांनी मुलीच्या आरोपी पालकांना अटक केली आहे.

    पोलीस सूत्रांनी सांगितले की, मुलगी स्वामी श्रद्धानंद परिसरात राहते. चार वर्षांपूर्वी तिला शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत भेट झाली. दोघेही प्रेमात पडले. ७ सप्टेंबर रोजी दोघांचेही रोहिणी कोर्टात लग्न झाले आणि तेथून ते त्यांच्या सासरच्या घरी पोहोचले. मुलगी रात्री घरी पोहोचली. रात्री 3 च्या सुमारास मुलीच्या आईला समजले की मुलीचे लग्न झाले आहे आणि ती शेजारच्या घरात आहे. ती सरळ तिथे गेली आणि मुलीला जबरदस्तीने घरी घेऊन आली.

    मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासूने सांगितले की मुलांचे लग्न झाले आहे, त्यांना इथेच राहू द्या. पण, तिच्या आईला हे लग्न मान्य नव्हते आणि ती मुलीला घेऊन गेली. पीडितेने आरोप केला की, कुटुंबातील सदस्यांनी प्रथम तिला खोलीत बंद केले आणि स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यामुळे तिला वाईट रीतीने मारहाण केली. मग चाकू गरम करून तिच्या चेहऱ्यावर चटके दिले मग कपडे वर करत तिच्या हाता-पायांवरही चटके दिले.

    मुलीच्या आईने तिच्यावर रॉकेल ओतल्याचाही आरोप केलेला आहे. सकाळी ८ वाजता तरुणीचा पती तिच्या घरी आला तेव्हा तिची अवस्था पाहून त्याने लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तरुणीला बाबू जगजीवनराम रुग्णालयात दाखल केले. पीडितेची आई आणि वडिलांना अटक केली आहे.