८ फुटांची मगर थेट घरात घुसली आणि…

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तब्बल आठ फुटांची एक मगर दिसत आहे. ही मगर एका घरात घुसलीय. मगरीने थेट घराकडे मोर्चा वळवल्यामुळे लोक चांगलेच घाबरले आहेत. ही मगर घरात नेमकी कशी आली याबद्दल कोणालाही कल्पना नाही.

    राजस्थान : मगर म्हटलं की आपण शहारुन जातो. मगरीच्या तावडीत एकदा सापडलं की सुटका करुन घेणे मुश्किल असते. कदाचित याच कारणामुळे आपण मगरीला घाबरतो. मगरीचे अनके व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ समाजमाध्यमावर चर्चेचा विषय ठरला आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील हा व्हिडिओ असून यामध्ये एक मगर थेट घरात घुसल्याचे आपल्याला दिसत आहे. नंतर मगरीला पकडताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घ्यावे लागलेले परिश्रम या व्हिडिओत दाखवण्यात आले आहेत.

    व्हिडिओमध्ये काय आहे ?

    सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तब्बल आठ फुटांची एक मगर दिसत आहे. ही मगर एका घरात घुसलीय. मगरीने थेट घराकडे मोर्चा वळवल्यामुळे लोक चांगलेच घाबरले आहेत. ही मगर घरात नेमकी कशी आली याबद्दल कोणालाही कल्पना नाही. मात्र, मगरीने हल्ला करु नये म्हणून त्या घरातील लोक थेट घराच्या भिंतीवर जाऊन बसले आहेत.

    वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घ्यावे लागले मोठे कष्ट

    मगर घरात घुसल्याचे समजताच कुटुंबियांनी वन विभागाशी संपर्क साधला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत मगरीला पकडण्याचे काम केले आहे. आठ फुटांच्या या मगरीला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. कर्मचाऱ्यांनी दोरीच्या मदतीने मगरीला घरातून फरफटत बाहेर काढलं आहे. तसेच मगरीला एका गाडीमध्ये टाकून सुरक्षित स्थळी सोडून दिले आहे.

    व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    दरम्यान, एका घराच्या आवारामध्ये मोठ्या दिमाखात फिरत असलेली मगर पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर Kirandeep या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

    crocodile enters in house video went viral on social media in rajasthan savaimadopur