तुमचं खातं कुठल्या बँकेत आहे? यापैकी कुठल्या बँकेत असेल तर मात्र वेळीच सावध व्हा

यामध्ये एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या ग्राहकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळतेय. या खातेधारकांना सायबर गुन्हेगार एक मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये एक लिंक पाठवण्यात येेते. त्या लिंकवर क्लिक करून इन्कम टॅक्स रिटर्न मिळवू शकता, अशी माहिती देण्यात येते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आयकर विभागाच्या वेबसाईटवर असतो, तशाच प्रकारचा एक फॉर्म उघडतो. 

  ग्राहकांना फसवून कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं लुबाडण्याचे ऑनलाईन प्रकार सध्या देशभर सुरू आहेत. सायबर गुन्हेगार ग्राहकांना फसवण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढत असतात. सध्या काही विशिष्ट बँकांच्या ग्राहकांना हे सायबर गुन्हेगार टार्गेट करत असल्याचं चित्र आहे.

  यामध्ये एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या ग्राहकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळतेय. या खातेधारकांना सायबर गुन्हेगार एक मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये एक लिंक पाठवण्यात येेते. त्या लिंकवर क्लिक करून इन्कम टॅक्स रिटर्न मिळवू शकता, अशी माहिती देण्यात येते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आयकर विभागाच्या वेबसाईटवर असतो, तशाच प्रकारचा एक फॉर्म उघडतो.

  या फॉर्ममध्ये ग्राहकांना त्यांचे आणि बँक खात्याचे बारीकसारिक तपशील विचारण्यात येतात. अकाऊंट नंबर, शाखा, IFSC कोड, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर वगैरे तपशील भरण्याची सूचना त्या फॉर्ममध्ये केलेली असते. ग्राहकांचे हे तपशील सहजरित्या सायबर गुन्हेगारांना प्राप्त होतात. अमेरिका आणि फ्रान्समधून हे व्यवहार चालत असल्याचं सांगितलं जातंय.

  सायबर सेलनं याविरोधात कारवाई करायला सुुरवात केली असून ग्राहकांनी कुठलीही माहिती ऑनलाईन गुन्हेगारांना देऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सायबर सेलच्या वतीनं काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्यात.

  • तुम्हाला बँकेकडून येणारा ओटीपी कुणाशीही शेअर करू नका
  • एखाद्या मेसेजमधून आलेली लिंक अजिबात उघडू नका
  • अनोळखी वेबसाईटवरून सामान खरेदी करणे टाळा. अशा ठिकाणी स्वस्त सामानाचं अमिष दाखवून तुमच्या क्रेडिट वा डेबिट कार्डच तपशील मिळवले जातात.
  • क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि बँक अकाऊंट यांचे पासवर्ड गुप्त ठेवा. ते कुणाशीही शेअर करू नका.