‘अंडरवर्ल्ड डॉन’ला सरकारचा मोठा धक्का ; दाऊदच्या राज्यातील प्रॉपर्टीचा होणार  लिलाव

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर सरकार लवकरच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकार दाऊदच्या रत्नागिरी जिल्हयातील 7 मिळकतींचा लिलाव नोव्हेंबरमध्ये लिलाव करणार आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर सरकार लवकरच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकार दाऊदच्या रत्नागिरी जिल्हयातील  ७ मिळकतींचा लिलाव नोव्हेंबरमध्ये लिलाव करणार आहे.

हा लिलाव भारत सरकारच्या स्मगलर्स एन्ड फोरेन एक्सचेंज मॅन्युप्युलेटर्स अँक्ट एक्ट (सैफीमा) या कायद्या अंतर्गत १० नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ही लिलाव प्रक्रीया ऑनलाईन होणार आहे. या आधी दाऊदच्या दक्षिण मुंबईतील अनेक मिळकतींचा लिलाव केला आहे.दाऊदच्या ज्या मिळकतींचा लिलाव होणार आहे. त्यामध्ये अधिकतर जमीन आहे. मिळकतीच्या लिलावासाठी प्रथम बोली देखील ठरवण्यात आली आहे. मिळकतींची माहिती देखिल प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामुळे लिलावात सहभागी होणाऱ्या लोकांना मिळकतींची माहिती मिळणार आहे. बोली लावणारांना या सातही मिळकती २ नोव्हेंबर २०२० पर्यंत पाहून खात्री करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव
या आधीही सरकारने दाऊदच्या अनेक मिळकतींचा लिलाव केला आहे. मात्र हा लिलाव दाऊदच्या मिळकतींचा सर्वात मोठा लिलाव असणार आहे़ ज्या ७ मिळकतींचा लिलाव होणार आहे त्यातील ६ दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबाके गावात आहेत. या आधी सैफीमाने मुंबईतील नागपाडा येथिल दाऊदच्या एका सदनिकेचा लिलाव केला होता. ही सदनिका की दाऊदची बहिण हसीना पारकर हीची असल्याचे बोलले जात होते.

या मिळकतींचा होणार लिलाव

* २७ गुंठे जमीन- न्युनतम किंमत २.०५ लाख

* २९.३० गुंठे जमीन- न्युनतम किंमत २.२३ लाख

* २४.९० गुंठे जमीन- न्युनतम किंमत १.८९ लाख

* २० गुंठे जमीन- न्युनतम किंमत १.५२ लाख

* १८ गुंठे जमीन- न्युनतम किंमत १.३८ लाख

* ३० गुंठे जमीन आणि घर – न्युनतम किंमत ६.१४ लाख

इक्बाल मिर्चीची दुबईतील मिळकत सील
इडीने मागच्या महिन्यात कुख्यात आरोपी इक्बाल मिर्चीच्या कुटूंबाची दुबईतील २०३ कोटी रुपयांची संपत्ती सील केली आहे. ईडीने सांगितले सील केलेल्या संपत्तीत १५ वाणिज्यिक अर्थात आवासीय मिळकती आहेत. ज्या इक्बाल मिर्चीच्या कुटूंबाच्या आहेत.यात ‘मिडवेस्ट होटल अपार्टमेंट’ नावाचे एक हॉटेल देखिल आहे. ईडी ने इडीने सांगितले की याची किंमत २०३.२७ कोटी रुपये अंदाजे धरण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले या मिळकती दुपईतील अशा कंपनीकडून इक्बाल मिर्चीला हस्तांतरीत केल्या होत्या ज्यांची मालकी वाधवान बंधूंच्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याकडे होती.