tocilizumab

औषध उत्पादक कंपनी हेटेरोच्या कोरोनावरील औषधाला भारतीय औषध नियंत्रण महामंडळानं(DCGI Gave Approval For Using Hetero`s Tocilizumab) मंजुरी दिली आहे. कोरोनावरील उपचारासाठी(New Medicine For Corona) प्रौढांवर आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. हेटेरोने याबाबतची माहिती दिली आहे.

    भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.औषध उत्पादक कंपनी हेटेरोच्या कोरोनावरील औषधाला भारतीय औषध नियंत्रण महामंडळानं(DCGI Gave Approval For Using Hetero`s Tocilizumab) मंजुरी दिली आहे. कोरोनावरील उपचारासाठी(New Medicine For Corona) प्रौढांवर आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. हेटेरोने याबाबतची माहिती दिली आहे.

    “रुग्णालयात दाखल प्रौढांवर उपचारासाठी डॉक्टर टोसिलिझुमॅबचा (टोसिरा) वापर करू शकतात”, असं कंपनीनं निवेदनामध्ये सांगितलं आहे. हैदराबाद येथील हेटेरोच्या प्लांटमध्ये टोसिराची निर्मिती केली जाणार आहे. हेटेरो कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर आणि फॅविपीरावीरची निर्मितीदेखील करते.

    “भारतात हेटेरोच्या टॉसिलिझुमॅब (टोसिरा) ला मंजुरी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोतं. यामुळे कोरोनावर उपचार करण्यासाठी मदत होणार आहे.”, असं हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉ. बी पार्थ सारधी रेड्डी यांनी सांगितलं आहे.

    “हे औषध सिस्टमिक कॉर्टिकोस्टिरॉईड्स, अत्यावश्यक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) वर असलेल्या रुग्णांवर वापरले जाऊ शकते. या औषधाचं न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सरकारसोबत काम करू.”, असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.