सावधान ! डेबिट-क्रेडिट कार्डधारकांचा डेटा होतोय लीक, वैयक्तिक माहिती हॅकर्ससाठी ठरतेय मौल्यवान

लीक झालेल्या डेटामध्ये (Debit-credit cardholder data leaks) फोन नंबर, ई-मेल्स, कंपनीचे नाव आणि उत्पन्नाची माहिती असल्याचं सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया (Rajshekhar Rajaharia) यांनी आयएएनसी बोलताना म्हटलं आहे.

नवी दिल्ली : देशातील जवळपास ७० लाख भारतीयांचा वैयक्तिक डेटा (personal information) लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या लीक झालेल्या डेटामध्ये (Debit-credit cardholder data leaks) फोन नंबर, ई-मेल्स, कंपनीचे नाव आणि उत्पन्नाची माहिती असल्याचं सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया (Rajshekhar Rajaharia) यांनी आयएएनसी बोलताना म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीक झालेला डेटा २ जीबी असून युजर्संचा मोबाईल प्रकार आणि मोबाईल अलर्ट सुरू आहे की नाही, यासंदर्भातही माहिती आहे. हा डेटा २०१० ते २०१९ या कालावधीतील असून तो हॅकर्ससाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजहरिया यांनी म्हटलं आहे.

लीक झालेला डेटा हॅकर्संसाठी अतिशय मौल्यावान

लीक झालेल्या डेटामध्ये कार्ड नंबर नाहीत, हा डेटा थर्ड पार्टीकडून लीक झाल्याची शक्यता आहे. बँकांसोबत क्रेडिट आणि डेबिट कार्ड देण्यासंदर्भात करार केलेल्या कंपन्यांकडून सुमारे ५ लाख कार्ड धारकांचा पॅन क्रमांकही या डेटामध्ये लीक झाल्याचे संशोधकानी म्हटलं आहे.