इयत्ता 12 वीच्या परीक्षांबाबत निर्णय लवकरच ; राज्यांना 25 मेपर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन

बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसोबत सुरू असलेली बैठक संपली आहे. दिल्ली वगळता सर्व राज्ये बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ही परीक्षा होम सेंटरवरच घेण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली : सीबीएसई (CBSE) बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार आहे. राज्यांना 25 मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतर केंद्र सरकार याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल यांनी दिलीय.

    बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांसोबत सुरू असलेली बैठक संपली आहे. दिल्ली वगळता सर्व राज्ये बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ही परीक्षा होम सेंटरवरच घेण्यात येणार आहे.

    पासवर्ड प्रोटेक्टेड ई-पेपर केंद्रावर पाठविला जाणार आहे. बैठकीत सीबीएसईने सांगितले की ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेऊ शकतात. बैठकीनंतर लवकरच ही तारीख जाहीर केली जाईल असा विश्वास आहे.

    बारावीच्या परीक्षेबाबतच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली होती. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त बैठकीत परीक्षेसंदर्भात अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.