देहरादून-दिल्ली शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; प्रवाशांची उडाली तारांबळ

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला अचानक आग लागली. एक्स्प्रेसच्या सी-४ डब्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. ही घटना कांसरो जवळ घडली आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती उत्तराखंडचे पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यांनी दिली आहे.

    देहरादून : दिल्लीहून देहारादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याचं समजताच लोको पायलट आणि गार्ड यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रेन कांसरो रेल्वे स्थानकात थांबवली. यानंतर राजाजी टायगर रिझर्व्ह आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. धावत्या ट्रेनला आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार,

    दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत रेल्वतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.