पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट होऊनही बायडन यांच्यासह १३ देशांच्या नेत्यांना टाकलं मागे ; अमेरिकेतील कंपनीचं सर्व्हेक्षण

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत (Approval Rating) घट झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. मोदींच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.