देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली. भारतीय जनता पक्षाने बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली (appointed in charge of Bihar Assembly elections), असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सदस्यीय राज्य विधानसभेच्या तीन टप्प्यातील निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी जदयू आणि एलजेपीसारख्या मित्रपक्षांसह जागावाटपाच्या व्यवस्थेविषयी चर्चा केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून फडणवीस बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अंतर्गत बैठकीत भाग घेत होते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बिहारला भेटही  दिली होती. राज्य निवडणुकीत प्रभारी म्हणून वरिष्ठ नेत्यांची नेमणूक करण्याची प्रथा भाजपमध्ये आहे.  २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार असून, मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल.