ट्विटरवरून दिग्विजय सिंह ट्रोल

दिल्ली : मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर अनेक शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. अशातच मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासमवेत पाच विरोधी पक्षांचे नेते यांनी ९ डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये होते. या मुद्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक खोचक ट्विट केले होते. पण त्या ट्विटवरून तेच ट्रोल झाले. २४ राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ आज शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याच्या मागणीबाबत राष्ट्रपतींना भेटायला जात आहे. परंतु मला राष्ट्रपतींकडून यासंदर्भात कोणतीही अपेक्षा नाही. मला वाटते की या २४ राजकीय पक्षांनी एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा करायला हवी ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी असेल. नितीश कुमार यांनीही मोदी सरकारवर दबाव टाकायला हवा, असे ट्विट त्यांनी केले होते.

हाफिज, झाकिरपासूनच अपेक्षा असते का?

या ट्विटवर एका युजरने जहरी टीका करत तुमच्यासारखे लोक असेच वागतात. ज्या देशात तुम्ही राहता, ज्या देशाचं मीठ खाता, त्या देशाच्या सरकार आणि राष्ट्रपतींकडून तुम्हाला काहीही अपेक्षा नसते. कारण तुमच्यासारख्यांना इस्लामिक दहशतवादी हाफिज सईद आणि झाकीर नाईक यांच्यासारख्यांकडून अपेक्षा असते. तुमच्यासारख्या नेत्यांवर आम्ही थुंकतो. आम्हाला लाज वाटते की आताच्या काळातील जनतेने तुमच्यासारख्या लोकांना नेता म्हणून निवडले आहे, अशा शब्दांत एका युजरने त्यांच्यावर टीका केली. तसेच, इतरही काही युजर्सने त्यांच्या ट्विटचा समाचार घेतला.