dilip Ghosh

पश्चिम बंगालमध्ये(west bengal) २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघात केला आहे. भाजप अध्यक्ष आणि नेता दिलीप घोष(dilip ghosh) यांनी ममता बॅनर्जींविषयी(mamata banerjee) अपशब्द वापरला आहे. त्यामुळे घोष यांच्यावर टीका केली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे(west bengal election) वारे वेगाने वाहू लागले आहेत. भाजप आणि तृणमुल काँग्रेस मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. अशातच भाजप अध्यक्ष आणि नेता दिलीप घोष(dilip ghosh) यांनी ममता बॅनर्जींविषयी(mamata banerjee) अपशब्द वापरला आहे. त्यामुळे घोष यांच्यावर टीका केली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघात केला आहे. जय श्रीराम म्हणण्यात ममता बॅनर्जी यांना काय त्रास होतो? असं म्हणत भाजप नेता दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींसाठी आक्षेपार्ह शब्द वापरत शिवीगाळ केली.

पश्चिम बंगालच्या बनगावमधील सभेला संबोधित करताना भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या रक्तात काय आहे? त्यांना जय श्री राम म्हणू शकत नाहीत. श्रीरामासोबत असं वर्तन का केलं जात आहे,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही सत्तेत आल्यावर कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिलीप घोष यांनी मर्यादा सोडत अपशब्द वापरल्यानं त्यांच्यावर पक्षाकडून काही कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.