कृषी कायदे मागे घेतले नाही, तर ..; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

श्रीगंगानगर येथे संयुक्त किसना मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतीला संबोधित करण्यासाठी राकेश टिकैत गेले होते. काही खासगी कंपन्यांनी नवीन कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर गोदामे बांधण्यास सुरुवात केली आहे. अन्नधान्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर या कंपन्यांची गोदामे शेतकऱ्यांकडून लक्ष्य केली जातील, अशा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

    श्रीगंगानगर : दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या १०० दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) देशभरातील विविध राज्यांमध्ये जाऊन किसान महापंचायतींना संबोधित करीत आहेत.

    श्रीगंगानगर येथे संयुक्त किसना मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचायतीला संबोधित करण्यासाठी राकेश टिकैत गेले होते. काही खासगी कंपन्यांनी नवीन कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर गोदामे बांधण्यास सुरुवात केली आहे. अन्नधान्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर या कंपन्यांची गोदामे शेतकऱ्यांकडून लक्ष्य केली जातील, अशा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

    केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बँका, विम्या कंपन्या आणि अन्य सरकारी उपक्रम खासगी कंपन्यांना विकण्याचा घाट घालत आहे. इतकेच नव्हे, तर आता असा कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे की, ज्यामुळे दूध, वीज, खते, बियाणे आणि मोटार वाहनांचे मार्केटिंग थेट खासगी कंपन्यांच्या हातात जाईल, असा दावा राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला.