अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर PM मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासून अराजकाचे वातावरण आहे. तालिबानने म्हटले आहे की भारत अफगाणिस्तानात सुरू झालेली विकासकामे पूर्ण करू शकतो. त्यांनी आश्वासन दिले आहे की, तालिबान कोणत्याही परदेशी व्यक्तीचे नुकसान करणार नाही.

    नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर PM मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी या विषयावर सुमारे 45 मिनिटांपर्यंत चर्चा केली आहे. या मुद्द्यावर दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील हे संभाषण अत्यंत महत्त्वाचे आहे.

    तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासून अराजकाचे वातावरण आहे. तालिबानने म्हटले आहे की भारत अफगाणिस्तानात सुरू झालेली विकासकामे पूर्ण करू शकतो. त्यांनी आश्वासन दिले आहे की, तालिबान कोणत्याही परदेशी व्यक्तीचे नुकसान करणार नाही.

    भारताने आतापर्यंत आपल्या शेकडो नागरिकांना परत आणले आहे. त्याचबरोबर तालिबानबाबत भारताची चर्चा अमेरिका, ब्रिटनसोबतही सुरू आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याशी या विषयावर बोलले. याशिवाय दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही या विषयावर चर्चा झाली आहे.