देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर पडणार ताण, येत्या १ जूनपासून नवे दर होणार लागू

येत्या १ जूनपासून विमान प्रवासाचे नवे दर लागू(New Air Fare) केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महाग होणार आहे.

  नवी दिल्ली : येत्या १ जूनपासून तुमच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे.कारण सरकारने हवाई भाड्याची मर्यादा १३ ते १६ टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या १ जूनपासून विमान प्रवासाचे नवे दर लागू(New Air Fare) केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महाग होणार आहे.


  नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ४० मिनिटांच्या प्रवासासाठी १ जूनपासून २६०० रुपये आकारण्यात येणार आहे. सध्या या प्रवासासाठी २३०० रुपये मोजावे लागतात. तसेच ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. मात्र १३ टक्के वाढ करण्यात आल्याने आता ३३०० रुपये मोजावे लागणार आहे.

  दरपत्रक

  • ६०-९० मिनिटे ४०००
  • ९०-१२० मिनिटे ४७००
  • १२०-१५० मिनिटे ६१००
  • १५०-१८० मिनिटे ७४००
  • १८०-२१० मिनिटे ८,७००

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता ३० जूनपर्यंत रद्द ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात जाणाऱ्यांसाठीची विमानं ही ३० जूनपर्यंत बंद राहतील.


  या निर्णयाने एअरलाइन्स कंपन्यांचे नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे.