Dissatisfaction in Bihar government Nitish Kumar is taking advantage of power only because of the greatness shown by BJP nrvb
बिहार सरकारमध्ये असंतोष; भाजपने दाखवलेल्या मोठेपणामुळेच नितीशकुमार घेत आहेत सत्तेचा लाभ

पाटणा : बिहारमध्ये इंडिगो एअरलाईन्सचे स्टेशन मॅनेजर रुपेश कुमार सिंह यांची हत्या करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांसह राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनेही कायदा व सुव्यवस्थेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रुपेश हत्याकांडाबाबत भाजपाचे खासदार विवेक ठाकूर यांनी पोलिसांना पाच दिवसात प्रकरणाचा निपटारा करण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा अल्टीमेटमही त्यांनी दिला आहे.

दुसरीकडे जनता दल युनायटेडने कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत म्हटले आहे की, नितीशकुमार यांना कोणाकडूनही प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही.

बेजबाबदारपणा खपणार नाही
कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अधिकाधिक जागरूक राहण्याची सूचना भाजपा नेते व कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सरकारची प्रतिमा आणि सुशासन यावर कधीही तडजोड केली नाही, असे अमरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा सहन करणार नाही.

यूपी मॉडल लागू करा
भाजपाचें छत्तीसगडचे सह प्रभारी आणि बांकीपूरचे आमदार नितीन नवीन यांनी बिहारमध्ये सरकारला गुन्हेगारी नियंत्रणाचे उत्तरप्रदेशातील एनकाऊंटर मॉडेल लागू करण्यास सांगितले आहे. बिहारमधील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे सरकारसाठी एक मोठे आव्हान आहे. याचा बिहार सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. छपराचे भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी यांनीही पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.