अशी शाळा नको रे बाबा ! नवरीने लग्न मंडपातच घेतली नवरदेवाची शाळा अन मग काय … नवरदेवाला २ चा पाढा नाही आला म्हणून नवरीने दिला  लग्नास नकार

नवरदेव अशिक्षित आहे. नवरदेवाच्या घरातील लोकांनी त्याच्या शिक्षणाबाबत आम्हाला अंधारात ठेवलं होतं. तो कदाचित शाळेतही गेला नसेल. नवरदेवाच्या परीवाराने आम्हाला फसवलं. मात्र, माझ्या बहादूर बहिणीने न घाबरता त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला'

    आतापर्यंत तुम्ही अनेकदा लग्न मोडण्याची विविध कारण ऐकली असतील मात्र या कारणांमध्ये नवरदेवाला २ चा पाढा आला नाही म्हणून लग्न मोडल्याचे कारण कधी ऐकले नसेल. तर मग आता हेही एक कारण लग्न मोडण्यास उत्तर प्रदेशात कारणीभूत ठरले आहे. घडले असे की, शनिवारी उत्तर प्रदेशच्या महोबातील एका गावात अरेंज मॅरेज होणार होतं. नवरदेव ठरल्याप्रमाणे सांयकाळी वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचला. वरात पोहोचण्याआधी नवरीला कुठूनतरी माहिती मिळाली की, नवरदेवाचं तेवढं शिक्षण झालेलं नाही जेवढं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे नवरीने सप्तपदी घेण्याआधी नवरीने नवरदेवाची टेस्ट घेण्याची प्लॅन केला.

    नवरदेव नवरीच्या टेस्टमध्ये झाला फेल

    जेव्हा एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याची वेळ आली तेव्हा नवरीने नवरदेवाला २ चा पाढा म्हणण्यास सांगितले. अचानक अशाप्रकारची मागणी नवरीने केल्याने नवरदेव बुचकळ्यात पडला. जेव्हा नवरीने पुन्हा जोर देऊन ही मागणी केली तर नवरदेव पाढा म्हणण्याचा प्रयत्न करू लागला होता. मात्र अनेक प्रयत्नांनंतरही त्याला पाढा म्हणता आला नाही. त्यानंतर नवरीने चक्क त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

    एसएचओ विनोद कुमार म्हणाले की, हे एक अरेंज मॅरेज होतं. नवरेदव महोबा जिल्ह्यातील धवार गावातील होता. दोन्ही परिवारातील लोक लग्नासाठी एकत्र जमले होते. मात्र, २ चा पाढा म्हणता आला नाही म्हणून नाराज नवरीने ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला. नवरी म्हणाली की, ती अशा व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही, ज्याला गणिताचं बेसिकही येत नसेल. घरातील लोकांनी मुलीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरीने कुणाचं ऐकलं नाही.

    नवरीचा चुलत भाऊ म्हणाला की, त्यांना हे समजल्यावर धक्का बसला की, नवरदेव अशिक्षित आहे. नवरदेवाच्या घरातील लोकांनी त्याच्या शिक्षणाबाबत आम्हाला अंधारात ठेवलं होतं. तो कदाचित शाळेतही गेला नसेल. नवरदेवाच्या परीवाराने आम्हाला फसवलं. मात्र, माझ्या बहादूर बहिणीने न घाबरता त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला’