कोरोनापासून बचाव करण्यासाठी डबल मास्कींग ठरतोय सर्वात उपयुक्त पर्याय, ८५.४ टक्क्यांपर्यंत रोखू शकतो ड्रॉपलेट ; कसा कराल याचा योग्य वापर?

डबल मास्कींग म्हणजे एकाचवेळी दोन मास्क घालणे. यामध्ये एक सर्जिकल मास्क असतो आणि एक एका कपडेचा मास्क असतो. कपड्याचा मास्क एकदा वापरल्यानंतर तो धुवून सुद्दा त्याचा परत एकदा वापर करता येतो.

  देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी डबल मास्कींग सर्वात उपयुक्त पर्याय ठरत आहे. डबल मास्कींग म्हणजे एकाचवेळी दोन मास्क घालणे. यामध्ये एक सर्जिकल मास्क असतो आणि एक एका कपडेचा मास्क असतो. कपड्याचा मास्क एकदा वापरल्यानंतर तो धुवून सुद्दा त्याचा परत एकदा वापर करता येतो.

  परंतु सर्जिकल मास्कला धुवू शकत नाही. त्यामुळे अधिक प्रमाणात लोक या मास्कचा वापर करत नाहीत. परंतु सर्जिकल मास्कचा सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा वापर करता येतो. डबल मास्कींग केल्यानंतर सर्जिकल मास्कचा वापर पाच वेळा करता येऊ शकतो.

  कोरोनापासून बचाव करण्यासाठी डबल मास्कचे ‘हे’ आहेत फायदे

  • डबल मास्क ८५.४ टक्क्यांपर्यंत रोखू शकतो ड्रॉपलेट
  • सर्जिकल मास्क ५६.१ टक्क्यांपर्यंत रोखू शकतो ड्रॉपलेट
  • मास्कला कागदाच्या इन्व्हलेपमध्ये ठेवणे गरजेचे
  • सर्जिकल मास्कला सात दिवसांसाठी ड्राय प्लेसवर ठेवा

  ‘या’ जागेवर करा डबल मास्कचा उपयोग

  1) प्रवास करताना या मास्कचा उपयोग करू शकतो
  2) हॉस्पिटलमध्ये या मास्कचा उपयोग होतो.
  3) घरातून बाहेर जाताना सुद्धा या मास्कचा वापर होऊ शकतो.
  4) गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंग न असलेल्या ठिकाणी या डबल मास्कचा वापर करतात.