balram bhargav

आयसीएमआरचे महासंचालक(ICMR DG) डॉ. बलराम भार्गव(Balram Bhargav) म्हणाले, देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची(Signs Of Corona Third Wave) चिन्हे दिसत आहेत.

    देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची(Corona Patients) संख्या कमी झाली आहे. या संख्येत जवळपास ३० टक्के घट झाल्याने आता देशातील कोरोनाची प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी झाली आहेत. त्याचबरोबर देशातील काही राज्यात अजूनही १० टक्क्याने प्रकरणे वाढत आहेत.

    महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम यासारख्या राज्यांमध्ये १० टक्क्यापेक्षा जास्त पॉझिटीव्हीची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या संसर्गाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

    आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे दिसत आहेत. कोरोनामुळे शरीरात रक्त गोठते. तसेच आणखी एक कारण म्हणजे लसीकरणानंतर पडून राहल्यामुळे रक्त गोठते. त्यासाठी आम्ही ब्लड थिनर देतो. आता सर्वसामान्यांनाही साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे यावे लागेल. गर्दीत सामुदायिक जबाबदारी पार पाडावी लागेल.”

    लव अग्रवाल म्हणाले, हिलस्टेशन्सवर जाणारे लोक कोविड-प्रोटोकॉलचे अनुसरण करीत नाहीत. त्यांनी शासकीय मार्गदर्शक तत्वांचा योग्य प्रकारे पालन करावे, अन्यथा आम्ही पुन्हा निर्बंध लागू करु. आपण शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास महामारी पुन्हा एक भयानक प्रकार येऊ शकते.