काश्मीरसाठी अणुबॉम्ब टाका; पाक संसदेत खासदार बरळला

पॅलेस्टाईनवर इस्त्रायलकडून जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलविरोधात पाकिस्तान हा तुर्कस्तानसोबत मिळून षडयंत्र रचत आहे. यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पॅलेस्टाईनच्या बहाण्याने तुर्कीला गेले असून मुस्लिम देशांची आघाडी उघडण्याचे स्वप्न पाहत आहेत. अशावेळी पाकिस्तानच्या एका खासदाराने इस्त्रायल आणि भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे वक्तव्य केले आहे.

    इस्लामाबाद : पॅलेस्टाईनवर इस्त्रायलकडून जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलविरोधात पाकिस्तान हा तुर्कस्तानसोबत मिळून षडयंत्र रचत आहे. यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पॅलेस्टाईनच्या बहाण्याने तुर्कीला गेले असून मुस्लिम देशांची आघाडी उघडण्याचे स्वप्न पाहत आहेत. अशावेळी पाकिस्तानच्या एका खासदाराने इस्त्रायल आणि भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे वक्तव्य केले आहे.

    इस्त्रायलविरोधात 57 मुस्लिम देशांना एकत्र आणण्यासाठी सोमवारी एक परिषद बोलविण्यात आली होती. हे देश इस्त्रायलविरोधात एकत्र येण्याऐवजी आपापसातच भिडले आहेत. अशावेळी पाकिस्तानचे खासदार मौलाना चित्राली यांनी इम्रान खान सरकारला इस्त्रायलविरोधात जिहादच एकमेव उपाय असल्याचे म्हटले आहे. मौलाना चित्राली यांनी पाकिस्तानी संसदेमध्ये हे वक्तव्य केले आहे.

    पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सरकारने अणुबॉम्ब आणि मिसाईलचा वापर करण्यास मागे पुढे पाहू नये. आम्ही अणुबॉम्ब काय म्युझियममध्ये पाहण्यासाठी बनविले आहेत का? जर आम्ही पॅलेस्टाईन आणि काश्मीरला स्वतंत्र करू शकत नाही तर आम्हाला मिसाईल, अणुबॉम्ब आणि विशाल सैन्याची काहीच गरज नाही, अशी दर्पोक्ती चित्राली यांनी केली.