bank closed

युएफबीयूने १५ आणि १६ मार्च या दोन दिवशी संप(bank employees strike) पुकारला आहे.या संपात १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला असा दावा संघटनेने केला. कामगार संघटनाच्या एकजुटीने संपाचा(bank strike) परिणाम बँकिंग सेवेवर झाला आहे.

    दिल्ली: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (यूएफबीयु) आवाहनानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या देशव्यापी संपामुळे चेक क्लिअरिंगसह अन्य बँकिंग सेवांवर विपरित परिणाम झाला. सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात या संपाचे आवाहन करण्यात आले आहे. युएफबीयूने १५ आणि १६ मार्च या दोन दिवशी संप पुकारला आहे.या संपात १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला असा दावा संघटनेने केला. कामगार संघटनाच्या एकजुटीने संपाचा परिणाम बँकिंग सेवेवर झाला आहे.

    खासगीकरणास विरोध

    खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेच्या शाखांमध्ये मात्र नियमित काम सुरू होते. या संपात खासगी क्षेत्रातील बँकांनी भाग घेतला नाही. दरम्यान ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी या संपाचा व्यापर परिणाम झाला असून चलन बाजार तसेच शेअर बाजारावरही याचा विपरित परिणाम दिसून आला असल्याचा दावा त्यांनी केला.

    केंद्र सरकारने आयडीबीआय आणि दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणाची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यावरून कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय यांच्यासह मुंबईतील प्रमुख सरकारी बँकांच्या शाखांचे कामकाज ठप्प झाले. या संपात यूएफबीयूच्या नेतृत्वात येणाऱ्या अ्नय बँक संघटनांमध्ये ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी), नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स एसोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडियासह (बीईएफआई) इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन (आयएनबीईएफ), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स कांग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑगर्नायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) आणि नॅशनल ऑगर्नायझेशन ऑफ बँक आफिसर्सचा (एनओबीओ) समावेश आहे.