हृदय हेलावणारी घटना: कोविडमुळे आईचं दुबईत निधन; ११ महिन्यांचा मुलगा अस्थी घेऊन मायदेशी परतला अन् बाबांच्या अश्रूंचा फुटला बांध

संबंधित मृत महिलेचं नाव भारती (वय-३५) असून त्यांना तीन मुलं होती. यातील मोठ्या मुलाची किडनी खराब झाल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. पण मुलाच्या उपचारामुळे संबंधित दाम्पत्य कर्जबाजारी झालं होतं. त्यामुळे भारती यांना कामानिमित्त दुबईला जावं लागलं.

    त्रिची : ११ महिन्यांच्या बाळाला (11 months old child) घेऊन दुबईत (Dubai) काम करण्यासाठी गेलेल्या एका भारतीय महिलेचा (Indian woman death in Dubai) काही दिवसांपूर्वी कोरोनामुळं (Corona infection) मृत्यू झाला होता. आईचा मृत्यू झाल्यानं ११ महिन्यांचं बाळ परक्या देशात अडकून पडलं होतं. पण गुरुवारी आपल्या आईच्या अस्थी घेऊन हे बाळ सुखरूप मायदेशी परतलं आहे. त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाळाचं स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी बाळाचे वडिलही याठिकाणी उपस्थित होते. या घटनेच्या वेळी उपस्थित असणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते.

    संबंधित मृत महिलेचं नाव भारती (वय-३५) असून त्यांना तीन मुलं होती. यातील मोठ्या मुलाची किडनी खराब झाल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. पण मुलाच्या उपचारामुळे संबंधित दाम्पत्य कर्जबाजारी झालं होतं. त्यामुळे भारती यांना कामानिमित्त दुबईला जावं लागलं. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या ११ महिन्याच्या बाळाला घेऊन दुबईला गेल्या होत्या. याठिकाणी गेल्यानंतर २९ मे रोजी त्यांना कोविडची लागण झाली. काही दिवस उपचार केल्यानंतर भारती यांचा दुबईतचं मृत्यू झाला. भारती यांच्यावर दुबईत उपचार सुरू असताना त्यांच्या काही मित्रांनी बाळाची काळजी घेतली.

    पण आईच्या मृत्यूनंतर ११ महिन्यांचं बाळ देवेश परक्या देशात एकाकी पडलं होतं. त्यामुळे कुटुंबाची होरपळ होतं होती. या घटनेची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना मिळाल्यानंतर, त्यांनी त्वरित बाळाला दुबईवरून मायदेशी आणण्याची व्यवस्था केली. यासाठी दुबईतील डीएमकेचे आयोजक मोहम्मद मीरान यांनी मोलाची मदत केली. त्यानंतर गुरुवारी इंडिगो विमानानं ११ महिन्यांच्या बाळाला त्याच्या आईच्या अस्थीसोबत मायदेशी आणण्यात आलं आहे.

    तामिळनाडूतील त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर बाळाला आणि आईच्या अस्थी वडील वेलावन यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. परक्या देशातून परतलेल्या ११ महिन्यांच्या मुलाला मिठीत घेतल्यानंतर वडील वेलावन यांना अश्रूंचा बांध आवरता आला नाही. कल्लाकुरिचीचे खासदार यांनी बाळाच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. सोबतचं कुटुंबाला आर्थिक मदत करणार आहेत.

    due to covid 19 infection mother dies in dubai 11 month old boy returned home with mothers ash