सणांच्या आधी आणखी एक झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने जनता गॅसवर, दिल्ली-मुंबईत किंमत झाली ८९९ रुपये

१ ऑक्टोबर रोजी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४३.५ रुपयांपर्यंत वाढ केली.

    नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी (Petrolium Companies)  घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे The price of a LPG cylinder has been increased by Rs 15). दिल्ली-मुंबईमध्ये विना सबशिडी १४.२ किलो सिलिंडरची किंमत आता ८९९.५० रुपयांवर गेली आहे. ५ किलो सिलिंडरची नवीन किंमत आता ५०२ रुपये आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

    १ ऑक्टोबर रोजी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४३.५ रुपयांपर्यंत वाढ केली. दिल्लीत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १६९३ रुपयांवरून १७३६.५ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.