ऐन सणासुदीत मुंबईसह देशभर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उधळला ; महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून ६ अटकेत

भारतात दहशतवादी हल्ला घडविण्याच्या कट दाऊदच्या भावाचा होता.त्याने सहा दहशतवाद्यांचे दोन ग्रुप बनवले होते. एका ग्रुपला दाऊदचा भाऊ अंनिस इब्राहिम सूचना देत होता. सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणून ती वेगवेगळ्या राज्यांत पाठवण्याची या ग्रुपवर जबाबदारी सोपवली होती. हा ग्रुप सणासुदीत स्फोट घडवण्यासाठी जागोजागी शस्त्रास्त्र ठेवणार होता.शस्त्रास्त्रे आणणाऱया ग्रुपला पैसे पुरवण्याची जबाबदारी दुसऱया ग्रुपवर होती.

    रामलीला आणि नवरात्रोत्सवात मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे.दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पत्रकार परिषदेत या मोठया कारवाईची माहिती दिली. पोलिसांनी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशातून ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर विस्फोटक व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. या कटामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिसचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या सांगण्यावरून दहशतवादी ऐन सणासुदीच्या दिवसात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

    दहशतवाद्यांना पाकिस्तानात दिले प्रशिक्षण

    भारतात मोठी जीवितहानी घडवण्याचा पाकिस्तानचा कट होता. यासाठी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानात बॉम्ब बनवण्याचे आणि एके-४७ चालवण्याचे १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवाद्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करताना पहिली अटक महाराष्ट्रातून करण्यात आली. सर्वात आधी दहशतवादी सालेमला पकडण्यात आले. दोघांना दिल्लीतून अटक केली, तर उत्तर प्रदेशातून तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तसेच इतर १५ जणांनाही दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याचाही संशय आहे.

    दाऊदच्या भावाचा होता कट

    भारतात दहशतवादी हल्ला घडविण्याच्या कट दाऊदच्या भावाचा होता.त्याने सहा दहशतवाद्यांचे दोन ग्रुप बनवले होते. एका ग्रुपला दाऊदचा भाऊ अंनिस इब्राहिम सूचना देत होता. सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणून ती वेगवेगळ्या राज्यांत पाठवण्याची या ग्रुपवर जबाबदारी सोपवली होती. हा ग्रुप सणासुदीत स्फोट घडवण्यासाठी जागोजागी शस्त्रास्त्र ठेवणार होता.शस्त्रास्त्रे आणणाऱया ग्रुपला पैसे पुरवण्याची जबाबदारी दुसऱया ग्रुपवर होती. हवालाच्या माध्यमातून पैसे आणणे व ते दहशतवाद्यांपर्यंत पोहोचते करणे ही जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. दहशतवाद्यांना हवी ती सगळी मदत पुरवण्याचे काम या ग्रुपवर सोपवले होते.