भारतापेक्षा अफगाणिस्तानात आर्थिक स्थिरता ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली: भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) झालेली मोठी घसरण या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात या वित्तीय वर्षात भारताच्या जीडीपी विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दिल्ली: भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) झालेली मोठी घसरण या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात या वित्तीय वर्षात भारताच्या जीडीपी विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बरोबरच भारताचा विकासदर हा बांगलादेशच्या विकासदराहून कमी राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतापेक्षा अफगाणिस्तानात अधिक स्थिरता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी देखील जीडीपीसंदर्भात सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या वेळी त्यांनी भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या आर्थिक स्थिरतेचा मुद्दा मांडत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला आहे. राहुल गांधी ट्विटमध्ये लिहितात, ‘भाजप सरकारची आणखी एक कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने देखील उत्तम प्रकारे कोविडची परिस्थिती हाताळली आहे.’

हे टीकास्त्र सोडत असताना राहुल गांधी यांनी आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला देत एक तक्ता देखील शेयर केला आहे. यात भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वित्तीय वर्षात अफगाणिस्तानच्या जीडीपीत ५ टक्के, तर पाकिस्तानच्या जीडीपीत ०.४०टक्के इतकी घसरण पाहायला मिळेल असे या तक्त्यात दाखविण्यात आले आहे.