ईडीकडून मोठी कारवाई, भारताची महत्त्वाची माहिती चिनी अधिकाऱ्यांना पुरवल्याबद्दल पत्रकाराला अटक

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने दिल्लीतील एका फ्रिलान्सिंग करत असलेल्या पत्रकाराला अटक(Ed Arrested Freelance Journalist) केली आहे. राजीव शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे.

    भारताविषयी महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती चिनी हेर(China) विभागाच्या अधिकाऱ्यांना पुरवल्याच्या आरोपाखाली ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने दिल्लीतील एका फ्रिलान्सिंग करत असलेल्या पत्रकाराला अटक(Ed Arrested Freelance Journalist) केली आहे. राजीव शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना १ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. शुक्रवारी राजीव शर्मा यांना स्थानिक न्यायालयात दाखल केलं असता ७ दिवसांच्या ईडीच्या कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे.

    दरम्यान, प्रेस क्लब ऑफ इंडिया( PCI )नं या कारवाईचा निषेध केला आहे. ६२ वर्षीय राजीव शर्मा हे नावाजलेले फ्रिलान्स जर्नालिस्ट असून प्रेस क्लब ऑफ इंडियाचे दीर्घकालीन सदस्य आहेत, असं पीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

    ईडीच्या मते, राजीव शर्मा यांनी चीनच्या हेर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवली. त्यामुळे देशाची सुरक्षा आणि हिताला धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राजीव शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. याबदल्यात राजीव शर्मा आणि इतर काही जणांना हवालामार्फत पैशांची देवाणघेवाण करण्यात आली होती. यासाठी दिल्लीच्या महिपालपूर परिसरात असलेल्या बनावट कंपन्यांचा वापर करण्यात आला. या कंपन्यादेखील चिनी नागरिकांच्या नावावर आहेत.