जेईई मेन परीक्षेबाबतचा संभ्रम शिक्षणमंत्र्यांनी केला दूर, तारखांची केली घोषणा – ‘या’ दिवशी होणार परीक्षा

आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक(Ramesh Pokhriyal Nishank)यांनी जेईई मेन परीक्षेबाबतची(JEE Main Exam 2021) भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला.

    जेईई मेन परीक्षेच्या(JEE Main Exam 2021) तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षांबाबत परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम(Confusion About JEE Exam) निर्माण झालेला होता. अखेर आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक(Ramesh Pokhriyal Nishank)यांनी जेईई मेन परीक्षेबाबतची(JEE Main Exam 2021) भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला.

    शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेच्या तारखांची घोषणा करत सांगितले की, जेईई मेनची तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलै पासून २५ जुलै पर्यंत होईल. तर, जेईई मेन चौथ्या टप्प्यातील परीक्षा जी मे महिन्यात होणार होती, ती २७ जुलैपासून २ ऑगस्ट २०२१ पर्यंत होईल.

    जे विद्यार्थी काही कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत, त्यांना अर्ज करण्यासाठी एक संधी दिली जात आहे. त्यानुसार आता आज (६ जुलै) रात्रीपासून ८ जुलै २०२१ पर्यंत रात्री ११.५० पर्यंत अर्ज करता येणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी ९ जुलै पासून ११ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.


    शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, मी अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला धन्यवाद देऊ इच्छित आहे. याशिवाय एनटीए ने या तिन्ही दिवसांच्या आत परीक्षा केंद्र बदलण्याची देखील संधी दिली आहे. यामुळे आपल्या सोयीनुसार या तीन दिवसांच्या आत बदल करता येणार आहे.