सध्या देशांमध्ये आठ लसींची चाचणी सुरु, कोरोना लस कधी उपलब्ध होणार ? मोदींनी दिले संकेत

देशामध्ये सध्याच्या घडीला आठ लसींची चाचणी सुरु असल्याची माहिती मोदींनी दिली. त्याचप्रमाणे कोरोना लसीसाठी कंपन्यांची पूर्ण तयारी असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यानंतर तातडीने लसीकरण सुरु केलं जाईल असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज कोरोना लसीसंदर्भातील (Corona Vaccine) आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार ? तसेच ही लस सर्वात आधी कोणार दिली जाणार, या संदर्भातील सविस्तर माहिती देशामध्ये लसनिर्मित करणाऱ्या कंपन्यांना भेट दिल्यानंतर मिळाली आहे. एकीकडे कोरोनाची लस निर्मिती सुरू असली तरी कोरोना संदर्भात बेसावध राहणं परवडणारं नाही. असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं आहे.

वैज्ञानिकांशी चर्चा झाली असून देशामध्ये सध्याच्या घडीला आठ लसींची चाचणी सुरु असल्याची माहिती मोदींनी दिली. त्याचप्रमाणे कोरोना लसीसाठी कंपन्यांची पूर्ण तयारी असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यानंतर तातडीने लसीकरण सुरु केलं जाईल असं मोदी म्हणाले. कोरोना लसीकरणाच्या वेळी आजारी आणि वृद्धांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे फ्रण्ट लाईनवर काम करणाऱ्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यवश्यक सेवेतील व्यक्तींना लस देताना प्राधान्य दिलं जाईल असं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

सध्या देशांमध्ये आठ लसींची चाचणी सुरु असून त्यापैकी तीन लसी या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. कोरोनासंदर्भातील लसीसाठी फारशी वाट पहावी लागणार नाही. पुढील काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध होईल असे स्पष्ट संकेत मोदींनी आपल्या भाषणामध्ये दिले आहेत.