‘ना विजयाचा जल्लोष ,ना मिरवणुका ,ना गुलाल’ निकालबाबत निवडणूक आयोगाची ‘नियमावली’ जाहीर

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. २ मे रोजी मतमोजणी दिवसासाठी कोविड प्रोटोकॉल बनवून त्याचे अनुसरण करण्याचे त्यांनी आयोगाला बजावले.   निकालसाठी निवडणूक आयोगाने काही नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोणत्याही प्रकरचा मतमोजणीच्या वेळी किंवा निकालानंतर कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही किंवा उत्सव साजरा केला जाणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. इतकेच नाहीतर निकालानंतर विजयाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवाराला केवळ दोनच लोकांसह जाता येणार आहे.

  तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. मात्र निकालसाठी निवडणूक आयोगाने काही नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोणत्याही प्रकरचा मतमोजणीच्या वेळी किंवा निकालानंतर कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही किंवा उत्सव साजरा केला जाणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. इतकेच नाहीतर निकालानंतर विजयाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवाराला केवळ दोनच लोकांसह जाता येणार आहे.

  न्यायालयाने दिला मतमोजणी रोखण्याचा इशारा 
  कोरोनाची बिघडलेली परिस्थिती दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा फटकारले आहे. सरन्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. २ मे रोजी मतमोजणी दिवसासाठी कोविड प्रोटोकॉल बनवून त्याचे अनुसरण करण्याचे त्यांनी आयोगाला बजावले.

  मतमोजणीसंदर्भात उच्च न्यायालयाने या ६ प्रतिक्रिया दिल्या आहेत

  • मतमोजणीच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल लागू झाला आहे का नाही याची खात्री करा.
  • मोजणीच्या दिवशी कोणत्याही किंमतीवर राजकीय किंवा गैर-राजकीय कारण कोरोनाचे संक्रमण वाढवण्यास जबाबदार ठरू नये.
  • अन्यथा मोजणी योग्य पध्दतीने करा किंवा मग माता मोजणी ते पुढे ढकलले जातील.
  • सध्याच्या घडीला लोकांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. प्रशासनाला याची आठवण करून द्यावी लागत आहे.
  • नागरिक जिवंत असतील, तेव्हाच त्यांना या लोकशाही प्रजासत्ताकात जे हक्क मिळाले त्याचा उपयोग करण्यास ते सक्षम असतील.
  • आजच्या परिस्थिती जिवंत राहणे आणि लोकांना जिवंत ठेवणे, यानंतरच इतर सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.