Election 2020

निवडणूक आयोगाने(election commission) लोकसभेच्या बिहारमधील एका जागेसह अन्य काही राज्यांमधील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारीख जाहीर(assembly election dates declared केली आहे. गुजरात, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, कर्नाटक,  मणिपूर, मध्य प्रदेश, नागालँड, ओदिशा, उत्तर प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच आसाम, केरळ, तामिळनाडू व पश्चिम बंगालच्या ७ जागांसाठी पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने बाकीच्या राज्यांमधील विधानसभेच्या जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान ठेवले आहे. तर मणिपूरच्या जागेसाठी व बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होईल. सर्व जागांसाठी मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २७ जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. गुजरातमधील ८ जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात ७ जागा व झारखंड, मणिपूर, नागालॅण्ड, ओदिशा आणि कर्नाटकच्या प्रत्येकी २ व तेलंगणा आणि छत्तीसगडच्या १ जागेसाठी मतदान होईल. बिहारच्या लोकसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे.