election commission

निवडणूक आयोगाने नवा आदेश(new order by election commission) काढला आहे. या आदेशानुसार आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह(corona test negative report) अहवाल किंवा लसीकरण पूर्ण केल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    नुकत्याच झालेल्या ५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल(election result) २ मे रोजी जाहीर होणार आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने नवा आदेश(new order by election commission) काढला आहे. या आदेशानुसार आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण केल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    निवडणूक आयोगाने यासंदर्भात एक विशेष आदेश काढला आहे. २ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच राज्यांमध्ये मतमोजणी आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रावर गर्दी करण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर मतमोजणी केंद्र पूर्णपणे सॅनिटाईझ करण्याचेही आदेश दिले आहेत.


    मतमोजणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही.

    यापूर्वी निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. आता नवा आदेश जारी करण्यात आला आहे.