भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर, प्रज्ञा सातव यांना संधी मिळण्याची शक्यता

भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission Of India)आज राज्यसभेच्या(Rajysabha By polls For 6 seats) ६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यसभा सदस्य निवडीसाठी निवडणूक आयोगानं वेळापत्रक(Timetable For Rajyasabha By polls) जारी केलं आहे.

    भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission Of India)आज राज्यसभेच्या(Rajysabha By polls For 6 seats) ६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यसभा सदस्य निवडीसाठी निवडणूक आयोगानं वेळापत्रक(Timetable For Rajyasabha By polls) जारी केलं आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. या निवडणुकीची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी होईल. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं जागा रिक्त झाली होती. या जागी राजीव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना जागा मिळण्याची शक्यता आहे.


    पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल. अर्ज मागे घेण्याची तारीख २७ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. मतदान आणि निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगानं ही संपूर्ण प्रक्रिया ६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असंदेखील कळवलं आहे. याशिवाय बिहारमधील विधानपरिषद निवडणूक देखील याचवेळी पार पडणार आहे.

    काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागी डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना नुकतेच प्रदेश उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे. राजकारणापासून दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव याच पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झाले असून राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.