हनीमूनच्या आधीच नवरदेव रहस्यमयरित्या गायब, नवरी मुलगी म्हणाली…

पीलीभीत: उत्तर प्रदेशातील पीलीभीत या ठिकाणी लग्नाचा दुसऱ्यादिवशी आणि हनिमूनच्या आधीच नवरदेव अचानक रहस्यमयरित्या गायब झाला आहे.हा नवरदेव कुठे गेला किंवा कोणी अपहरण केलं, याबद्दल कुठलीच माहिती मिळाली नाही. नातेवाईकांनी तब्बल २४ तास सर्व आकाश पाताळ एक केल्यानंतरही नवरदेवाचा कोणताही सुगावा हाती लागला नाही.

सिसैइया साहब गावात राहणारे लोकेंद्र यादव याचे लग्न ९ डिसेंबर रोजी झालं होतं. अगदी वाजत गाजत मोठा लवाजमा घेऊन हे लग्न आनंदानं पार पडलं होतं. १० डिसेंबरला लोकेंद्र वधूला घेऊन आपल्या घरी आला.तो गावचा प्रमुख देखील आहे. कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशाप्रकारे नवरदेव अचानक गायब झाल्यामुळे नवरीने रडून रडून सारं घर डोक्यावर घेतलं आहेत. गायब झालेला वर हा गावचा प्रमुखही आहे. सध्या कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यावरून तक्रार नोंदवली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. हे संपूर्ण प्रकरण बिलसंडा पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
असं म्हटलं जात आहे, की लग्नाच्या रात्री अकराच्या सुमारास लोकेंद्रने दोन लोकांना फोन केला होता. फोनवर बोलल्यानंतर लोकेंद्र घराबाहेर पडला आणि परत आलाच नाही. लग्नाच्या घरात नवरदेव अचानक गायब झाल्याने अनागोंदी निर्माण झाली. नातेवाईकांनी रात्रभर नवरदेवचा शोध घेतला. खूप प्रयत्न करूनही त्यांना काहीही सापडलं नाही. त्यामुळे पहाटेच कुटुंबीय तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला पोहचले. नवरदेवाचा मोठा भाऊ जोगेंद्र यानं नवरदेव बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक दृष्टीकोनातून याप्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी अनेक नातेवाईकांचे जाबही नोंदवले गेले आहेत.