माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुखर्जी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी रुग्णालयात गेले असताना त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आणि या चाचणीद्वारे मुखर्जी यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.

प्रणव मुखर्जी यांनी आपला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या सगळ्यांना विलगीकरणात राहण्याची आणि कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका दुसऱ्या कामासाठी रुग्णालयात गेलो होतो पण त्यावेळी मला कोरोना झाल्याचे समजले. गेल्या ८ दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. तसेच आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.