देशभरात पुन्हा लॉकडाऊन लावावा की नाही? तज्ज्ञांची विविध मतं, कोरोनाचा आलेख चढताच…

काहींच्या मते लॉकडाऊन लावला तर रुग्णसंख्येची वाढ आटोक्यात यायला मदत होणार आहे, तर काहींच्या मते लॉकडाऊनमुळे एका मोठ्या आर्थिक संकटाला आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे लॉकडाऊन लावताना सारासार विचार करणे, हेच योग्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू असून दररोज ३ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावावा किंवा कसे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी याबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.

  काहींच्या मते लॉकडाऊन लावला तर रुग्णसंख्येची वाढ आटोक्यात यायला मदत होणार आहे, तर काहींच्या मते लॉकडाऊनमुळे एका मोठ्या आर्थिक संकटाला आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे लॉकडाऊन लावताना सारासार विचार करणे, हेच योग्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अशी आहेत तज्ज्ञांची विविध मतं.

  • कंटेनमेंट झोनही जर आपण यशस्वी करू शकत नसू, तर देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात काहीच हशील नाही. शहर किंवा जिल्हा स्तरावर एकवेळ लॉकडाऊन ठिक आहे. मात्र देशव्यापी लॉकडाऊनची चूक पुन्हा करता कामा नये.
  • लॉकडाऊनमुळे केवळ कोरोनाविरुद्धची रणनिती आखण्यासाठी वेळ मिळू शकतो. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. व्हेटिलेटर्सचं प्रमाणही कमी आहे. मात्र यांचं नियोजन करणं हीच सध्याची गरज आहे. लॉकडाऊन हा या क्षणाचा योग्य पर्याय नाही
  • लसीकरणाचा वेग कमी झालाय, ही खरी समस्या आहे. लॉकडाऊन हे त्याचे उत्तर नाही. लॉकडाऊनमुळे गरीबांच्या पोटापाण्याचा आणि रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि सरकारने लसीकऱणाचा वेग वाढवावा.
  • गेल्या लॉकडाऊनच्या वेळी रुग्णसंख्या कमी होती. आता ती अधिक आहे आणि वेगाने पसरत आहे. लॉकडाऊन देशव्यापी करण्याऐवजी स्थानिक पातळीवर करून कोरोनाबाधितांची साखळी तोडणे गरजेचे आहे.