सरकारी आदेशांचे पालन करण्यात अपयशी, Twitter ला इतक्या डॉलर्सचा दंड

 या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मॉस्कोच्या एका कोर्टाने फेसबुक आणि गुगलला अशाच एका आरोपाखाली दंड ठोठावला होता. दरम्यान, भारत सरकारने ट्विटरच्या ताज्या निवेदनावर पलटवार केला आहे, ज्यात भारताने अभिव्यक्ती स्वातंत्र्यास ‘संभाव्य धोका’ असल्याबद्दल ट्विटरबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

    ट्विटर (Twitter) हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतातील आयटी नियमांच्या वादात अडकला आहे. दरम्यान, ट्विटरवर बंदी घातलेली सामग्री काढून टाकण्यात प्लॅटफॉर्म अपयशी ठरल्यामुळे रशियाच्या स्थानिक कोर्टाने ट्विटरला 1.9 दशलक्ष रूबल (सुमारे 259,000 डॉलर्स) इतका दंड ठोठावला आहे.

    तसेच, अनधिकृत निषेधासाठी कंपनीचा दंड वाढवून 2.79 कोटी रुबल (380,000 डॉलर्स) करण्यात आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात रशियामध्ये अशाच गुन्ह्यांसाठी ट्विटरला 121,000 डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला होता.