पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, जाणून घ्या आजचे दर?

शुक्रवारी संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Yesterday was not change in price) कोणताच बदल झाला नव्हता. मात्र आज पेट्रोल-डिझेलचे दर ११ पैसे ते १४ पैशांपर्यंत (Today Fall prices of petrol and diesel) कमी झाले आहेत. तसेच डिझेलच्या किंमतीत १२ पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत ८८.५१ रुपये प्रतिलिटर पेट्रोल तर ७९.४५ प्रतिलिटर डिझेल मिळत आहे.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel  prices) दरात कपात करण्यात आली आहे. झाल्याने, आज शनिवारी (Saturday) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून आले आहे. काल शुक्रवारी संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Yesterday was not change in price) कोणताच बदल झाला नव्हता. मात्र आज पेट्रोल-डिझेलचे दर ११ पैसे ते १४ पैशांपर्यंत (Today Fall prices of petrol and diesel) कमी झाले आहेत. तसेच डिझेलच्या किंमतीत १२ पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत ८८.५१ रुपये प्रतिलिटर पेट्रोल तर ७९.४५ प्रतिलिटर डिझेल मिळत आहे.

राजधानी दिल्लीत ८१.८६ रुपये प्रतिलिटर पेट्रोल तर ७२.९३ प्रतिलिटर डिझेल असे दर झाले आहेत. कोलकाता येथे सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या किंमती घट झाली आहे. पेट्रोल १३ पैशांनी कमी होत ८३.३६ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल १२ पैशांनी कमी होत ७६.४३ रुपये प्रतिलीटवर आले आहे.

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्याकडून दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. यामध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टींचा समावेश करुन पेट्रोल-डिझेलचे दर जवळजवळ दुप्पट होतात.