हॅलो, टिकटॉक, शेअर इटसह ५९ मोबाईल अॅप्लिकेशन्सवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली: देशाच्या एकात्मतेला धोका पोहचवू शकणाऱ्या ५९ मोबाईल अॅप्लिकेशनवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशाच्या सैन्यदलासाठी आणि राज्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला

नवी दिल्ली: देशाच्या एकात्मतेला धोका पोहचवू शकणाऱ्या ५९ मोबाईल अॅप्लिकेशनवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशाच्या सैन्यदलासाठी आणि राज्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कायद्याच्या ६९ ए कलमानुसार हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या ५९ मोबाईल अॅप्सद्वारे जी माहिती क्रायन्वित होत होती, त्याचा धोका लक्षात घेता ही बंदी घालण्यात आली आहे.    

डिजिटल क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भारताची ओळख ही आघाडीच्या कल्पकतेची राहिली आहे. मात्र त्याच वेळी १३० कोटी भारतीयांच्या वैयक्तिक सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर राहिलेला आहे. त्यातच भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. 
या अॅप्सवर बंदी – TikTok, Shareit, Kwai, UC Browser, Baidu map ,Shein ,Clash of Kings ,DU battery saver ,Helo ,Likee,YouCam makeup, Mi Community ,CM Browers ,Virus Cleaner ,APUS Browser ,ROMWE ,Club Factory ,Newsdog ,Beuty Plus ,WeChat ,UC News, QQ Mail,Weibo, Xender, QQ Music,QQ Newsfeed ,Bigo Live, SelfieCity,Mail Master, Parallel Space ,Mi Video Call – Xiaomi 
WeSync, ES File Explorer, Viva Video – QU Video Inc ,Meitu ,Vigo Video ,New Video Status ,DU Recorder,Vault- Hide,Cache Cleaner DU App studio, DU Cleaner,DU Browser ,Hago Play With New Friends, Cam Scanner,Clean Master – Cheetah Mobile,Wonder Camera 
Photo Wonder,QQ Player,We Meet ,Sweet Selfie