अखेर २१ दिवसांनंतर इंधन दरवाढीला ब्रेक…

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सर्वत्र पसरत आहे. मागील २० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. त्याचबरोबर इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत उच्चांक पाहायला मिळत होता. परंतु

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सर्वत्र पसरत आहे. मागील २० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. त्याचबरोबर इंधन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत उच्चांक पाहायला मिळत होता. परंतु अखेर २१ दिवसानंतर इंधन कंपनीकडून दरवाढीला ब्रेक मिळाल्यामुळे, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कालच्या दिवसात पेट्रोल २५ पैसे प्रतिलिटर, तर डिझेल २१ पैसे प्रतिलिटर महाग झाले होते. परंतु आजच्या दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढीचे भाव स्थिरावले आहेत.

आज भारताची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल ८०.३८ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ८०.४० प्रतिलिटर दराने विकले जात आहे. दरम्यान, भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल ८७.१४  रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ७८.८१ रुपये प्रतिलिटर दर आहे. आज इंधन दरवाढीमध्ये स्थिरता असल्यामुळे, सर्वसामान्य वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु गेल्या तीन आठवड्यातील एकूण दर पाहता, पेट्रोल प्रतिलिटर जवळपास ९.१२ रुपये, तर डिझेल ११.०१ रुपयांनी महागले होते.