इंधन दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

केंद्र आणि राज्यांनी दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांमध्ये कमतरता आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ओपीईसी देशांनी उत्पादनाचं जे अनुमान लावलं होतं, तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीसाठी आधीचं सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंधन दरवाढ एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामध्ये किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कोणतचं उत्तर देणं योग्य नाही. केंद्र आणि राज्यांनी दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांमध्ये कमतरता आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

    केंद्र आणि राज्यांनी दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांमध्ये कमतरता आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ओपीईसी देशांनी उत्पादनाचं जे अनुमान लावलं होतं, तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तेलाच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण नाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्चं तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात, असंही त्यांनी सांगितले.