शेतकऱ्यांना 4000 रुपयांची आर्थिक मदत, आज शेवटची तारीख, रजिस्ट्रेशन कसे कराल? : जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्याचा कालावधी बुधवारी संपुष्टात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा असल्यास आजच्या दिवसात नोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांचा अर्ज स्वीकारला गेल्यास केंद्र सरकार थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करेल. गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आता नोंदणी करुन शेतकरी दोन्ही हप्ते मिळवू शकतात. दरम्यान त्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

    नवी दिल्ली : पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्याचा कालावधी बुधवारी संपुष्टात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा असल्यास आजच्या दिवसात नोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांचा अर्ज स्वीकारला गेल्यास केंद्र सरकार थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करेल. गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आता नोंदणी करुन शेतकरी दोन्ही हप्ते मिळवू शकतात.

    दरम्यान त्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

    रजिस्ट्रेशन कसे कराल?

    • सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
    • Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा.
    • आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल.
    • नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा.
    • त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा.
    • सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

    कधी मिळणार आर्थिक मदत ?

    एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

    बनावट शेतकऱ्यांनो सावधान…

    शेतकरी असल्याचं खोटं सांगत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आता या योजनेतील लाभार्थींची तपासणी सुरू झालीय. गावागावात जाऊन याबाबत चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे खोटी माहिती देऊन या योजनेंतर्गत शेतीसाठीची वार्षिक 6 हजाराची मदत घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांची मदत बंद तर केली जाईलच, मात्र सोबत याआधी मिळवलेल्या पैशांचीही भरपाई करुन घेण्यात येणार आहे. या योजनेत 5 टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी करण्याची तरतूद आहे.

    त्याचीच आता अंमलबजावणी सुरू आहे. उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यात या तपासणीला सुरुवातही झालीय. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी विभागातील अधिकारी गावा-गावात जाऊन या लाभार्थी यादीची पाहणी करुन सत्यता तपासत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 5 टक्के लाभार्थ्यांची यादी तयार झालीय. यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना ही यादी देऊन लाभार्थींचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्डची सत्यता तपासली जाईल. तसेच ते शेतकरी आहेत की नाही हेही पाहिलं जाईल. या तपासणीत ज्यांची माहिती खोटी सापडेल त्यांची मदत तातडीने बंद करण्यात येईल.